संस्था आणि कॉलेजविषयी

इंडो इस्त्रायली अॅग्रो इंडस्ट्रिज चेंबर या संस्थेची स्थापना सन १९९९ मध्ये धर्मदाय आयुक्तालयाच्या नोंदणी क्र. एफ-२२१३२ दि. २१/१/२००० अन्वये स्थापित झालेली संस्था आहे. इस्त्रायल देशासह जगातील कृषी आणि कृषी पुरक व्यवसायासह इतर सर्व प्रकारचे फायदेशीर व आर्थिक दृष्टया सवलत आणणारे तंत्रज्ञान, व्यवसाय, शिक्षण, संशोधन, अर्थसहाय्य, सांस्कृतिक, कार्यक्रम, कलाक्रिडा व इतर अनुषंगिक बाबींची देवघेव करून दोन्ही देशातील संबध सौहार्दपूर्ण वाढविणे आणि देशातील मुलां-मुलीचे / विद्यार्थ्यांचे / सुशिक्षित बेरोजगारांचे / रहिवाश्यांचे / शेतकऱ्यांचे / व्यवसाइकांचे आरोग्य व आर्थिक सुधारणा करून त्यांना स्वंयपूर्ण करण्याचे विविध उपक्रम संस्थेचा उद्देशास पात्र राहून राबविणारी संस्था आहे.

या संस्थेने देश आणि विदेशात शैक्षणिक सहली, अभ्यास दौरे, प्रदर्शन भेटी-चर्चा सत्र, कौशल्यवृध्दी विषयक सेमिनार आणि राज्यात विविध ठिकाणी व्यवसाय वृध्दीसाठी कृषी व कृषीपूरक शैक्षणिक विद्यालय स्थापित केलेली आहेत.

संस्थेने स्वतःचा आणि संगणकिय तंत्रज्ञानावर आधारित कृषी माहिती तंत्रज्ञान व कृषी व्यापार तंत्रज्ञान हे दोन अभ्यासक्रम तयार करून शासन अंगिकृत असलेले महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळ यांना सादर करून मान्यता मिळविलेली आहे. हे अभ्यासक्रम महाराष्ट्रात एकूण ७जिल्हयामध्ये सुरू असून चार महाविद्यालय दापचरी येथे सुरू आहेत.

या अभ्यासक्रमासाठी पालघर जिल्हयातील आदिवासी मुलांना प्रशिक्षण देण्याकामी शासनाच्या कृषी कोकण विभागीय कार्यालयाच्या अधिपत्या खाली दापचरी येथील राज्यस्तरीय फळरोपवाटिका येथील प्रात्यक्षिकसाठी पाच एकर क्षेत्र आणि प्रशिक्षण केंद्र मधील २ प्रशिक्षण हॉल, ४ वर्ग खोली, १ संगणक कक्ष, १ ग्रंथालय, २ कार्यालय, ३ वसतीगृह, ३ स्वच्छता गृह, १ भोजन गृह व क्रिडागंण इत्यादी बाबी नाममात्र भाडे दराने देऊन आमच्या उपक्रमांस सहकार्य केले आहे.

तसेच संस्थेने कृषी माहिती व व्यापार तंत्रज्ञान महाविद्यालय (स्थापना २००७-०८) मध्ये विविध प्रकारचे १० कौशल्यवृध्दीव्दारे कुशल मनुष्यबळ निर्मितीचे शासनमान्य पार्टटाईम प्रशिक्षण ६ महिन्याचे कृषी विभागांशी निगडीत कोर्स प्रशिक्षणामध्ये प्रवेश घेता येईल. संस्थेच्या कृषी शासनमान्य प्रशिक्षणामध्ये प्रवेश घेतल्यास त्याला संस्थेच्या योजनेच्या आधारे इ. ११वी व इ.१२ वी उत्तीर्ण मुलांना रोजगार स्वंयरोजगार देण्यात येणार असून आदिवासी भागातील मुलांचे राहणीमान सुधारून आर्थिक लाभ मिळणार आहे. असे दोन्ही शैक्षणिक लाभ प्रवेशार्थीना मिळणार आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने जूलै २००८ मध्ये संस्थेस विनायकराव बीपाटील कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्याल (वि. अ.) तत्वावर मान्यता देण्यात आली असून विद्यार्थी इयत्ता ११वी / १२वी कला व वाणिज्य शाखेचे शिक्षण घेत आहे. तसेच संस्थेने विनायकराव बीपाटील व्यवसायिक अभियांत्रिकी व कौशल्यवृध्दी महाविद्यालय सन २०१२-१३ संस्थेने व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाचे २ वर्ष कालावधीचे अभ्यासक्रमांना उच्च शिक्षणासाठीचे + २ स्तराची समकक्षतेचे ६ व्यवसायिक अभियांत्रिकी व कौशल्यवृध्दी अभ्यासक्रम सुरू केले आहे. याव्दारे आपल्याला रोजगार-स्वंयरोजगाराच्या हमीवर शासनमान्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Scroll to Top